अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात आहेत.
मोहोळ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलसवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी टोल प्रशासनाला पत्र दिले आहे.
आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना पेनूर टोल प्लाझा, सावळेश्वर टोल प्लाझा आणि इंचगाव टोल प्लाझा येथे टोलमाफी देऊन वाहने विनामूल्य सोडण्यात यावीत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.मराठा बांधवांच्या आंदोलनाला सहकार्याची भूमिका घेत, आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना शक्य ती सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी भूमिका आमदार राजू खरे यांनी मांडली आहे.
शिक्षकांच्या पगाराबाबत मोठा निर्णय! १ नोव्हेंबर पासून अतिरिक्त पदांवरील वेतन बंद होण्याची शक्यता; शिक्षण विभागाची ऑक्टोबर अखेरची मुदत
आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांची ओळख पटवून त्यांना टोलसवलत देण्याबाबत टोल प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सोलापूर ZP चे सातारा जिल्ह्यात विश्रामगृह; कुठे जनावरांचा गोठा, तर कुठे खासगी फार्महाऊस सारखा वापर? सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह!











