विशेष प्रतिनिधी : आकाश शिंदे
सोलापूर : नामांकित पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू, गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू, टेबल जुगार, मावा आणि लॉजिंगसह विविध अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे. या व्यवसायांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत असतानाच, काही पोलीस कर्मचारी किंवा संबंधित यंत्रणांकडून कथित वसुली केली जात असल्याचे गंभीर दावेही समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बँकेने जप्त केलेल्या लॉज-बिअर बारचे सील तोडले! ४४ लाखांचे कर्ज थकीत; देशमुख दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
मोठ्या आणि छोट्या धंद्यांसाठी स्वतंत्र वसुलीची चर्चा
मोठ्या व्यवसायांसाठी स्वतंत्र वसुली यंत्रणा, तर छोट्या व्यवसायांसाठी वेगळी व्यवस्था असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाळू, दारू, मटका, जुगार, गुटखा आणि टेबल जुगार अशा प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र व्यक्तीमार्फत पैसे गोळा केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पोलीस स्टेशन आणि DBच्या नावाने स्वतंत्र वसुली?
‘हिशोब दिला तर धंदा सुरू, अन्यथा कारवाई’ असा आरोप
पोलीस स्टेशनच्या नावाने कथित वसुली होत असल्याबरोबरच DB पथकाच्या नावानेही स्वतंत्र पैसे मागितले जात असल्याची चर्चा आहे. एका ठिकाणी पैसे दिल्यानंतर दुसऱ्या यंत्रणेकडूनही वेगळी मागणी होत असल्याचा आरोप काही व्यावसायिकांकडून केला जात असल्याचे सांगितले जाते.
काही अवैध व्यवसाय चालकांच्या म्हणण्यानुसार, ठरावीक रक्कम दिल्यानंतर व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जाते, तर पैसे न दिल्यास कारवाईचा दबाव आणला जातो. मटका, जुगार, दारू, देशी दारू, गुटखा, मावा आणि टेबल जुगार यांसारख्या व्यवसायांबाबत अशा प्रकारचे आरोप होत आहेत. विशेषतः MIDC परिसरातील काही व्यवसायांमधून मोठ्या प्रमाणात कथित वसुली होत असल्याचीही चर्चा आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
‘आमचे गाव दिवाळखोरीत निघाले, दिवाळी कशी साजरी करायची?’; तुळशी गावच्या मदतीला आमदार सुभाष देशमुख धावले, शिरपूर पॅटर्नच्या कामाला सुरुवात!
अवैध व्यवसायांशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार ठरावीक तारखेला पूर्ण झाल्यानंतर महिनाभर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. कारवाई झालीच तर ती केवळ दिखाव्यापुरती असते, तर मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करून छोट्या व्यावसायिकांवरच कारवाईचा दबाव आणला जातो, अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. या आरोपांमुळे कायद्याची समान अंमलबजावणी होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिना ठरला की धंदा बिनधास्त?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्त चौकशी करावी
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याचे सांगितले जाणारे अवैध व्यवसाय आणि त्यांच्या नावाने होत असल्याच्या कथित वसुलीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र गुप्त चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस स्टेशन किंवा DB पथकाच्या नावाने कोणी पैसे गोळा करत आहे का, याची तपासणी करावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित पोलीस प्रशासनाची भूमिका आणि या आरोपांबाबत त्यांचे स्पष्टीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे.
महिना ठरला की धंदा बिनधास्त..!
महिन्याच्या ठराविक तारखेला हिशोब पूर्ण झाला की, महिनाभर धंदा बिनधास्त चालतो. कारवाई होते ती फक्त दिखाव्यापुरती. मोठ्यांना अभय आणि छोट्यांना दमदाटी, हाच सध्या पॅटर्न झाल्याचा आरोप होतोय.
वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी
या संपूर्ण वसुली प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्त चौकशी करावी, स्टेशन + डिबी च्या नावावर वसुली करणारे कोण आहेत, हे उघड करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरतेय.
#Solapur #SolapurPolice #IllegalBusiness #PoliceAdministration #DBSquad #InfoSolapur










