शॉप ऍक्ट ऑनलाईन कसा काढावा?

कोणत्याही व्यवसायासाठी लागणारं सर्वात म्हत्वाच डॉक्युमेंट म्हणजे शॉप ऍक्ट, तुम्ही उत्पादन क्षेत्रात असा, सर्व्हिस क्षेत्रात असा तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे अस्तित्व दाखवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शॉप ऍक्ट ची गरज भासते. डिजिटल इंडिया च्या माध्यमातून आता शॉप ऍक्ट काढणे देखील ऑनलाईन सहज शक्य झाले आहे. आजच्या या लेखात आपण पाहुयात ऑनलाईन शॉप ऍक्ट का काढावा.
१. सर्व प्रथम https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-registration-of-shops-and-establishments.htm या लिंक ला भेट देऊन या पेजवर असलेल्या Click here for Online Application या लिंक वर क्लिक करा.

२. त्यांनतर येणाऱ्या पेज मध्ये Create Employer User Profile या लिंक वर क्लिक करून तुमची आणि तुमच्या व्यवसायाची माहिती भरा. (हि माहिती भरताना तुमची वैक्तिक माहिती जसे पॅन, आधार आणि मोबाईल क्रमांक (ज्यावर रजिस्ट्रेशन चा ओटीपी मिळेल) व तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे वगरे माहिती भरावी लागेल. या प्रोसेस नंतर तुम्ही या वेबसाईट चे रजिस्टर्ड युजर व्हाल आणि तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड या पोर्टल वर बनेल.

३. संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर खालील मेसेज येईल.

४. पुढच्या टप्प्या मध्ये आपल्या आपला युजर नेम आणि पासवर्ड देऊन लॉगिन करायचे आहे (बऱ्याच वेळा ऑटोसेव्ह होऊन हा तयारच येतो)

५. लॉगिन केल्यानंतर व्यवसायाच्या मालकाबद्दल वैयक्तिक माहिती भरावयाची आहे.

६. वरील माहिती भरल्यानंतर आपल्या व्यवसाबद्दल (व्यवसायाचे नाव, पत्ता, व्यवसायाचे स्वरूप इ) माहिती भरावयाची आहे.

७. पुढच्या टप्प्यामध्ये आधार कार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी आहे त्या दर्शनी भागाचे फोतो आणि प्रतिज्ञापत्र हे नमूद केलेल्या मेमरी साईझ मध्ये अपलोड करायचे आहेत

८. यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये शॉप ऍक्टची फी ऑनलाईन/डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा पेटीएम द्वारे भरू शकता

९. पेमेंट केल्यानंतर लॉगिन मध्ये पावती डाऊनलोड करता येईल

ऑनलाईन शॉप ऍक्ट काढण्याठी आपण ९८८१८९२५६५ या क्रमांका वर संपर्क करू शकता

ऑनलाईन शॉप ऍक्ट काढण्याठी आपण ९८८१८९२५६५ या क्रमांका वर संपर्क करू शकता (चार्जेस लागू)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *