पॉवर बँक घेताना कोणती काळजी घ्याल !

स्मार्टफोनच्या या जगात स्मार्टफोन हा अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकाच उपयोगी घटक झालेला आहे. वेगवेगळी मेमरी आणि बॅटरी खाणारी ऍप्लिकेशन्स, युट्युब, इंटरनेट इत्यादींच्या वापरामुळे स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकत नाही हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. मग याला पर्याय म्हणून पॉवर बँक चा वापर अनिवार्य ठरतो. प्रवासात तर आपल्या सोबत पॉवर बँक असणे जणू अनिवार्य झाले आहे.

मात्र हे खूप कमी लोकांना माहिती आहे कि फक्त पॉवर बँक घेऊन उपयोग नाही तर चुकीचा पॉवर बँक सरळ तुमच्या फोनला धोकादायक होऊ शकतो तर या लेखात आपण पाहुयात कि योग्य पॉवर बँक कसा निवडावा व तो घेताना कोणती काळजी घ्यावी.

आज बाजारात वेगवेळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या क्षमतेचे पॉवर बँक वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध आहेत. पॉवर बँक निवडताना आपल्या मोबाईल ला किती क्षमतेची बॅटरी आहे ते तपासून पाहणे गरजेचे असते. नॉर्मली आजकाल सर्व स्मार्टफोन ३५०० ते ४००० एमएएच(milliampere hours) या क्षमतेची बॅटरी सोबत असतात.

पॉवर बँक घेताना पॉवर बँकांची क्षमता कमीत कमी आपला फोन एकवेळ चार्ज करण्याची असावी म्हणजेच कमीत कमी ५०००एमएएच ची पॉवर बँक तुमचा फोन एक वेळ चार्ज करू शकेल. मात्र कधीहि अधिक क्षमतेची पॉवर बँक वापरणे हे आजच्या काळात सोयीचे ठरते.

पॉवर बँकेची क्षमता जितकी जास्त तितके त्याचे वजन असा एक साधारण हिशोब असतो कारण पॉवर बँकेच्या आत मध्ये असणारी बॅटरी ते ठरवते. मात्र आजकाल जास्त क्षमतेचे पॉवर बँक सुद्धा पोर्टबल स्वरूपात पहायला मिळतात. तर पॉवर बँकेची साईज( फिजिकल म्हणजे वजनाला) देखील पॉवर बँक घेताना विचारात घेतली पाहिजे.

आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पॉवर बँकेचे आऊटपुट किती आहे. पॉवर बँकेच्या टेक्निकल स्पेसिफिकेश मध्ये याचा उल्लेख असतो नॉर्मली १ A आउटपुट साधारण मोबाईल ला पुरेसा होतो मात्र २A आउटपुट असेल तर स्मार्टफोन फास्ट चार्ज होतो.

वरील सर्व गोष्टींचा विचार आपण पॉवर बँक करताना घेतला तर कधीच आपल्याला अरे यार बॅटरी संपली होती म्हणायची वेळ नक्कीच येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *